मुंबईत दोन दिवसांपूर्वी भाजपचे दक्षिणेतील नेते अण्णामलाई यांनी मुंबई हे महाराष्ट्राची नाही तर आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं वक्तव्य केलं होतं.. त्यावरून आता राज ठाकरेंनी जोरदार समाचार घेतलाय.. मुंबईत कोणीतरी रसमलाई आला होता, तुला काय करायचंय अशा शब्दात त्यांनी अण्णामलाईंवर सडकून टीका केलीय.. तर अण्णा मलाई आला आणि भाजपच्या मनातलं बोलून गेला असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.. त्याचबरोबर मुंबईला तोडण्याचा उद्योग सुरू झाला आहे.. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यातील लोक मुंबईत येतायत.. असं त्यांनी म्हटलंय...