राज्यसभेच्या एका जागेसाठी शिंदेंच्या शिवसेनेत ऐनवेळी इच्छुकांची गर्दी पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी शिवसेनेत ज्येष्ठ नेत्यांपासून अनेक माजी खासदार इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्यात उशीर होत असल्याची सूत्रांची माहिती आहे....दिवसभर एकनाथ शिंदे इच्छुक नेत्यांच्या गराड्यात अडकल्याने विधानभवनातील अर्थसंकल्पीय अधिवेशनालाही येऊ न शकल्याने चर्चा पक्षात जोरदार रंगली असल्याची चर्चा आहे. आता राज्यसभेसाठी शिवसेनेकडून शिंदे कुणाचे नाव पुढे देतात आणि पक्षात त्याचे काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचे असणार आहे.