पोलिसांना शरण जाण्यापूर्वी Ranjit Kasle यांची NDTV मराठीसोबत बातचीत, धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप

निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासलेंनी व्हिडिओ करुन स्वतःच सोशल मिडियावर टाकून उत्सुकता निर्माण केली होती.शेवटी आज रात्री साडेनऊ वाजता ते पुणे एअरपोर्टवर हजर झाले. माध्यमांसमोर येऊन त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं मात्र अजूनही ते पुणे पोलिसांना शरण आलेले नाहीत.आता ते सकाळी बीडला जातील असेही कासले सांगताहेत.. परळीत ईव्हीएमसोबत छेडछाड करण्यात आली, त्यासाठीच मला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाऊंटवर 10 लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले यांनी सांगितलं होतं.वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोपही कासलेंनी पुन्हा एकदा केला. कासलेंना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपांच्या फैरी झाडल्यात.

संबंधित व्हिडीओ