Ranveer Singh ला जीवे मारण्याची धमकी, Whatsapp वर धमकीचा मेसेज; रणवीरच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर, आता बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आला आहे.धमकीचा मेसेज व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटद्वारे पाठवण्यात आला असून मेसेजद्वारे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.धमकीनंतर, मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांकडून रणवीरच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.पोलिस धमकी देणारा आणइ व्हॉइस नोट पाठवणाऱ्याचा शोध सुरु आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःला कुख्यात बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं सांगितलं असून त्याचा तपास करण्यासाठी पोलीस सायबर सेलची मदत घेत आहेत.

संबंधित व्हिडीओ