मुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी, उंदीर मारण्याचं औषध फळांवर मारलं; Malad मधली संतापजनक घटना

मुंबईकरांना धडकी भरवणारी बातमी. आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तुम्ही फळं खात असाल तर ही फळं तुमच्याच जीवाला धोकायदायक ठरू शकतात.. मुंबईच्या मालाडमधून एक अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आलाय.. फळांना उंदीर मारायचं औषध लावणाऱ्या फळविक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. मालाडमध्ये एका फळ विक्रेत्याने उंदरांनी फळं खाऊ नयेत म्हणून उंदीर मारायचं औषध लावलंय.. उंदीर मारण्याची रॅटोल नावाची क्रीम तो फळांना लावत असल्याचं समोर आलंय. मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या विक्रेत्याच्या बेजबाबदारपणावर आता संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित व्हिडीओ