रत्नागिरीत गेली 25 वर्ष चक्क हस्तलिखित म्हणजे हातानी लिहिलेला दिवाळी अंक प्रकाशीत होतो. रत्नागिरीतील जनसेवा ग्रंथालय हा हस्तलिखित दिवाळी अंक काढतो. संपादकियपासून ते बालवाड्मयापर्यत तब्बल शंभरहून अधिक पानांचा हा अंक आहे. शब्दांकुर असं या अंकाचं नाव आहे. छापील कुठलाही लेख या अंकात समाविष्ठ नाही. मुखपृष्ठापासून ते शेवटच्या पानापर्यत हा अंक हाताने लिहून काढला जातो आणि तो प्रकाशित होतो. जनसेवा ग्रंथालयाच्या सभासद, वाचक यांच्याकडून हे लिखाण घेतलं जातं. लिहण्याची मागे पडत चाललेली सवय टिकावी यासाठी हा अनोखा उपक्रम इथं राबवला जातो. त्यामुळे वाचकही या अंकाची वाट पाहत असतात. याचाच आढावा घेत वाचकांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी