Ratnagiri| रत्नागिरीत आजपासून सुरू होतंय मोफत रूग्णालय, जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा उपक्रम

रत्नागिरीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरीत आजपासून मोफत रुग्णालय सुरू होत आहे.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने रत्नागिरीमध्ये श्री भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालय सुरू केलं आहे.आज या रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा होत असून या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत, बंदरे मंत्री नितेश राणे, भाजप नेते रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.दरम्यान हॉस्पिटलमध्ये एकही रुपया न घेता उपचार केले जाणार असून वेगवेगळ्या शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहेत.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी..

संबंधित व्हिडीओ