Ratnagiri| खेडमध्ये ताडगोळे गटारात धुतले, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परप्रांतियावर गुन्हा दाखल

रत्नागिरीच्या खेडमध्ये ताडगोळे गटारात धुणाऱ्या परप्रांतियावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवर विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार उघडकीस आला.याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अलाउद्दीन कुवुस शेख असं या संशयित आरोपीचं नाव असून, तो मूळचा झारखंडचा आहे. याबाबत पोलिस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ