Ratnagiri Unseasonal Rain| रत्नागिरीत अवकाळी पावसाची हजेरी; संगमेश्वरमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय.संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडासह अवकाळी पावसानं हजेरी लावली.अवकाळी पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक मंदावली.हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज ठरला खरा कोकणासाठी आज हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अलर्ट दिला होता. दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली.गेल्या अर्ध्या तासापासून पावसाच्या दमदार सरी बरसतायत.अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात आलं. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी

संबंधित व्हिडीओ