पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर विक्रीप्रकरणी मोठा वाद उफाळून आलाय.. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री आणि खासदार मोहोळ यांचं नाव समोर आल्यानं मोठी खळबळ माजली होती.. या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातला वाद उफाळून आलाय. धंगेकरांच्या आरोपावर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर वैफल्यग्रस्त व्यक्ती असल्याची टीका केलीय.. तर 'शेट्टींच्या आरोपानंतर बिळातील उंदीर बाहेर आलेत.. असं म्हणत मोहोळ यांनी नाव न घेता धंगेकरांवर टीका केलीय.