पालघर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केलीय.जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच खासगी आणि अनुदानित शाळांना उद्या सुट्टी लागू राहील. त्याचबरोबर नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.