कोकणवासीयांचा परतीचा प्रवास; Vadkhal - Ramwadi परिसरातही वाहतूक कोंडी, वाहनांच्या 3 किमीपर्यंत रांगा

गणपती आणि गौरी विसर्जनानंतर कोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.. रायगड जिल्ह्यात माणगाव-इंदापूरनंतर आता वडखळ-रामवाडी परिसरातही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.. वडखळजवळ वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला असून वाहनधारकांना संथ गतीने प्रवास करावा लागत आहे. Return journey of Konkan residents; traffic congestion in the Vadkhal-Ramwadi area too, with vehicle queues stretching up to 3 km.

संबंधित व्हिडीओ