ज्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळून रोहित शर्मा मोठा झाला, त्याच स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाचा स्टँड असणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्मा स्टँड असेल.स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियनच्या एका स्टँडला भारताचा हिटमॅन रोहित शर्माचे नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) घेतला आहे.त्याचप्रमाणे, स्टेडियममधील अन्य स्टँड्सना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर आणि एमसीएचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचेही नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मंगळवारी झालेल्या वार्षिक साधारण बैठकीत ‘एमसीए’ने हे निर्णय घेतले.