नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागातून आलेल्या साक्षी चांडक हिने वयाच्या अवघ्या १८व्या वर्षी चार्टर्ड अकाउंटंट इंटरमेडिएट परीक्षेत देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. तिच्या या यशामुळे नाशिक जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. कमी वयात मिळवलेल्या या यशामागे तिची मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य नेमकं किती महत्त्वाचं ठरलं? साक्षीच्या यशाचा प्रवास जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी..