छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातून मन हेलावणारी घटना समोर आलीय. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने नऊ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला आहे. विहामांडवा येथे ही घटना घडली आहे. समीक्षा विशाल निंबाळकर असे मृत महिलेचे नाव आहे.६ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आणि बाळाच्या गळ्याभोवती नाळ वेढल्याने तातडीने सिझेरियन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. मात्र, उपचाराचा खर्च करण्यास सासरच्यांनी नकार दिल्याचा आरोप आहे.