Sambhajinagar | शिक्षिकेसाठी विद्यार्थी अब्दुल सत्तारांच्या जनता दरबारात ढसाढसा रडले, पुढे काय झालं?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्या जनता दरबारात धाव घेतली. शिक्षिका सी. पी. शिरसाट यांची बदली झाल्याचे समजताच विद्यार्थी भावूक झाले आणि त्यांनी बदली थांबवण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेत आमदार सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ