सांगलीच्या मिरज या ठिकाणी रेल्वेपुलावर दुचाकी आणि चारचाकीचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातामध्ये दुचाकीस्वार हा गंभीर जखमी झाला आहे.हा अपघात इतका भीषण होता,की दुचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला. तर चार चाकी वाहनाचंही मोठं नुकसान झालं आहे.या अपघातामुळे काही वेळ सांगली-मिरज मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.