सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणी मध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे..,या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार देखील घडला आहे...या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईच्या मागणीसाठी थेट आटपाडी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत घटनेचा निषेध नोंदवला,..पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते.. पोलीस अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तर या ...रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे...घटने प्रकरणी संतप्त ग्रामस्थांकडून एका संशयित आरोपीला बेदम मारहाण देखील करण्यात आलाय.. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे... तसेच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंद ठेवण्यात आलं होतं...