नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होतेय. पलूस तालुक्यामध्ये गावांचा संपर्कही तुटलाय. नागठाणे शिरगाव या गावांचा संपर्क तुटलाय तर नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेलाय. पाणी पातळीत पंधरा फुटांची वाढ झाली आहे सध्या कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. मात्र नागठाणे बंधारा पाण्याखाली गेलाय. बंधाऱ्यावरती पाणी आलंय त्यामुळे ग्रामीण भागातील वाहतूकही ठप्प झाली आहे.