26/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाची चौकशी सुरु झालीय.तहव्वूर राणाची ऑन कॅमेरा चौकशी करण्यात येतीय, ही चौकशी रेकॉर्ड केली जाणार आहे.दरम्यान राणाची चौकशी एनआयएचे एसपी आणि डीसीपी ही चौकशी करतायत. एनआयए मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे.राणाच्या कोठडीदरम्यान एनआयए दररोज चौकशी डायरी तयार करणार आहे. आणि चौकशीच्या अंतिम फेरीनंतर, त्याचे खुलासा विधान रेकॉर्डवर घेतले जाईल. राणाच्या प्रत्यर्पणावरून राऊतांनी खोचक प्रतिक्रिया दिलीय.