बीडमध्ये मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोपींचे भिवंडी कनेक्शन समोर आले. या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याच्या इतर दोन साथीदारांसह तिघेही हत्याकांडानंतर अकरा डिसेंबरला भिवंडीत आपल्या ओळखीच्या मित्राकडे राहायला गेले होते.