Santosh Deshmukh| अपहरणावेळी संतोष देशमुखांचं काय होतं शेवटचं वाक्य? NDTV मराठीच्या हाती मोठी माहिती

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबी समोर येत असताना,अत्यंत महत्वाचा जबाब NDTV मराठीच्या हाती लागला आहे.देशमुख यांचा जेव्हा अपहरण करण्यात आलं त्याचवेळी त्यांची हत्या होणार आहे याची देशमुखांना चाहूल लागली होती.देशमुख यांच्या अपहरणावेळी त्यांच्यासोबत असलेल्या चालकाच्या जबाबातून ही माहिती समोर आली आहे.टोल नाक्यावर संतोष देशमुख यांना काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओत टाकण्यात आले.दरम्यान त्यांना स्कार्पिओ मध्ये टाकताना, संतोष देशमुख आपल्या चालकाला म्हणाले की,बंटू लवकर पोलिस स्टेशनला जा, हे लोक मला जीवे मारणार आहेत.त्यानंतर आरोपींनी त्यांचं अपहरण केलं आणि ती गाडी केजच्या दिशेने निघाली...

संबंधित व्हिडीओ