साताऱ्यात उपवासाच्या पिठातून विषबाधा झाल्याची घटना घडली.उपवासाच्या भाजनी पिठातून 35 जणांना विषबाधा झाली.वडूज भागातील घटनेनं खळबळ उडाली. 35 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मांडवे, उंबर्डे, कोकराळे, वाकेश्वर आणि गुरसाळे भागातल्या नागरिकांना ही विषबाधा झाली.अनेक रुग्णांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असून काहींना डिस्चार्जही मिळाला असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.