सहकार क्षेत्रातला आजचा काळा दिवस, आमचं बहुमत असल्यामुळे अध्यक्ष निवड केली- Satej Patil | Gokul

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आयोजित केलेली सभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. त्यामुळे शशिकांत पाटील-चुयेकर यांची अधिकृत सभेतून अध्यक्षपदी निवड होऊ शकली नाही. दरम्यान, काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने समांतर सभा घेत शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. ही निवड कायदेशीर असल्याचेही आघाडीच्या नवनिर्वाचित संचालकांनी म्हटले आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे १३, तर महायुतीचे १२ संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे समविचारी आघाडीचे पारडे जड झाले आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीसाठी १४ संचालकांचा कोरम आवश्यक असल्याने अध्यक्ष निवडीचा पेच कायम आहे.

संबंधित व्हिडीओ