Tiger Shroff Security | टायगर श्रॉफच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली, सध्याचे अपडेट्स काय? | NDTV Marathi
Security increased outside Tiger Shroff's house; what are the latest updates?
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी सायंकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्यावर तीन अज्ञात हल्लेखोरांनी तब्बल सात गोळ्या झाडल्या. यात टायगर श्रॉफचा चालक जखमी झाला आहे. तसेच टायगरच्या एका फॅनला देखील गोळी लागली आहे. गोळीबाराची ही घटना उघडकीस येताच सिनेसृष्टीसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हल्ल्यानंतर टायगर श्रॉफच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.