चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल लागली असून सकाळी आणि रात्री गारवा वाढू लागला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी सीमावर्ती भागातील चक पिरंजी गावात जागोजागी शेकोट्या पेटल्या आहेत. गावातील चौकाचौकांत आणि घरांसमोर ग्रामस्थ शेकोटीभोवती बसून गप्पागोष्टी करत थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत.