Bhiwandi मध्ये गादीच्या कारखान्याला भीषण आग, कापूस आणि गाद्यांचा साठा जळून खाक, लाखोंचं नुकसान

भिवंडी शहरातील इदगाह रोड परिसरातील फकी कंपाउंड येथील गादी कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. कारखान्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि गाद्यांचा साठा असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. या आगीत संपूर्ण कारखाना जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

संबंधित व्हिडीओ