Jalna Drought| जालना जिल्ह्यावर पाणीटंचाईचं भीषण संकट,पाणी बचतीसाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक नियमावली

दुष्काळाबाबत मराठवाड्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले आहे. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी नागरिकांसाठी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली आहे. यापुढे शहरी भागात वाहने धुण्यास बंदी घालण्यात आली असून, पाणीटंचाई संपेपर्यंत घरगुती नळाच्या किंवा बोअरवेलच्या पाण्याने वाहने धुण्यास.. तसेच रस्ते आणि अंगणात पाणी मारण्यास पूर्णपणे बंदी राहणार आहे. वाहन पुसण्यासाठी केवळ ओल्या कापडाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्विमिंग पूल व बांधकामासाठी पाण्याचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. व्यावसायिक आणि खाजगी स्विमिंग पूल तात्काळ बंद ठेवण्याचे, तर नवीन बांधकामांसाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर पूर्णपणे थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ