शक्ती चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्याला धोका नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तरीही, रत्नागिरी जिल्ह्यासह सर्व किनारपट्टीवरील जिल्ह्यांना खबरदारीचे निर्देश दिले आहेत. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.