शरद पवार गटाचे खासदार वर्ध्याचे अमर काळे यांनी सरकारवर गंभीर आरोप केलाय. हेतुपुरस्पर शासकीय कार्यक्रमातून डावललं जात असल्याचा आरोप अमर काळे यांनी केलाय, तर शासकीय निधीतून होत असलेल्या भूमिपूजन बोर्डावर खासदारांचं नाव राहत नाही, निमंत्रण पत्रिकेतही नाव नसतं असं म्हणत सरकारवर हल्लाबोल केलाय.अमर काळे हे शरद पवार गटाचे विदर्भातील एकमेव खासदार आहेत.