Sharad Pawar आज बारामती दौंड मधील दुष्काळाची पाहणी करणार, कुठे साधणार शेतकऱ्यांशी संवाद? पाहा

Sharad Pawar आज बारामती दौंड मधील दुष्काळाची पाहणी करणार, कुठे साधणार शेतकऱ्यांशी संवाद? पाहा Sharad Pawar to inspect drought conditions in Baramati and Daund today; where will he interact with farmers? Find out here. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आज बारामती तालुक्यातील आणि दौंड तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करतील. सकाळी ९ वाजेपासून शरद पवार यांच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात होईल. सकाळी ९ वाजता बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मयुरेश्वर मंगल कार्यालयात शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधतील. त्यानंतर ९.४५ वाजता जवळार्जुन येथे दुष्काळ स्थितीची पाहणी करतील. सकाळी 11 वाजता बारामती तालुक्यातील सुपा येथे पूजा गार्डनमध्ये ते शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर दौंड तालुक्यातील दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी ते मार्गस्थ होतील.

संबंधित व्हिडीओ