शिर्डीत पूर, दोघे बेपत्ता! राहाता तालुक्यात शनिवारपासून पाऊस थांबण्याचे नाव घेत नाहीये. नगर-शिर्डी रोडवरील साकुरी येथील ओढ्याला पूर आला आहे. काल रात्री चार दुचाकीस्वार वाहून गेले होते, त्यातील दोघांना वाचवण्यात यश आले असून, दोघे अद्याप बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे. राहाता तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.