Shivbhojan | शिवभोजन थाळी योजना 'महायुती'च्या काळात रखडली, थकबाकी मिळत नसल्याने केंद्र चालक अडचणीत

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना महायुती सरकारच्या काळात रखडली आहे....अनेक शिवभोजन केंद्र चालकांना राज्य सरकारकडून वेळेत थकबाकी मिळत नसल्यामुळे केंद्र चालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत....या पार्श्वभूमीवर शिवभोजन केंद्र चालकांची थकबाकी लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आमदार सुनील प्रभू यांनी केली आहे....यासंदर्भात आमदार सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेतली. शिवभोजन केंद्र चालकांची थकबाकी द्या, अशा सूचना आजच आपण मुख्य सचिवांना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले.

संबंधित व्हिडीओ