छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर मोठ्या प्रमाणात शिवभक्त दाखल होतायत. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीवर पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य पथक तैनात करण्यात आलंय. वन विभागाकडून प्लास्टिक बंदीचा संदेश देत गडावर प्लास्टिक बंदी करण्यात आली. गडावर येणाऱ्या प्रत्येकाची नाव नोंदणीही केली जातेय. यासंदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी पाहुया..