एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे वीस आमदार उदय सामंत यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. स्वतः सामंत यांनी हे वृत्त फेटाळलंय पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी कुठेतरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही असा दावा करत अप्रत्यक्षपणे शिंदे यांची शिवसेना फुटीच्या मार्गावर असल्याचं सूचित केलं आहे.