UPI व्यवहारांवर आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या विरोधात देशभरातील दुकानदार आता आक्रमक झाले आहेत. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने २ ऑक्टोबर रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन गांधीगिरी पद्धतीने करण्यात येणार असून व्यापाऱ्यांकडून UPI व्यवहारांवरील शुल्काचा निषेध नोंदवला जाणार आहे. UPI व्यवहारांवर आकारण्यात येणारे शुल्क चुकीचे असून त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे हे शुल्क तात्काळ मागे घ्यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. आंदोलनादरम्यान दुकानदार ऑनलाइन पेमेंट स्वीकारणार नाहीत