मनोज जरांगेंच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणी एसआयटी गठित करण्यात आलीय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर ही समिती स्थापन करण्यात आलीय... अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडेंच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय एसआयटी तपास करणार आहे.. बलकवडेंसह पोलिस उपायुक्त विजयकांत सागर, बजरंग बनसोडे यांचाही या एसआयटीत समावेश आहे.. ऑडिओ क्लिप्सची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे.. विशिष्ट कालवधीत ही समिती चौकशी पूर्ण करणार आहे..