सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. वांगचुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं असून त्यांच्या घराबाहेर मोठ्या संख्येने पोलीस आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहे. पोलीस त्यांना घराबाहेर जाऊ देत नाहीत. नसल्याची माहिती वांगचुक यांनी दिलीय..डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये पर्वतीय परिषदेची निवडणूक होणारेय. डिसेंबर महिन्यात लडाखमध्ये -15 ते -25 अंशांपर्यंत थंडी पडते. या काळात लडाखची मोठी लोकसंख्या लेहबाहेर जम्मू आणि दिल्लीला स्थलांतरित होते. याला हिवाळी स्थलांतर म्हणतात. डिसेंबरमध्ये निवडणुका घेतल्यास अनेकांना मतदान करता येणार नाही, त्यामुळे निवडणुका एप्रिल-मे 2027 पर्यंत पुढे ढकलाव्यात. अशी मागणी सोनम वांगचुक यांनी केलीय..दुसरीकडे, लडाख पोलिसांनी ही नजरकैद नसून निवडणुकीदरम्यान लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे पालन असल्याचं म्हटलंय..