Solapur | सोलापुरातील 'त्या' तीन माजी आमदारांच्या BJP प्रवेशाची तारीख निश्चित, जाणून घ्या अधिक

सोलापुरातील माजी आमदारांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित.29 ऑक्टोबरला 3 माजी आमदारांचा भाजप प्रवेश होणार.तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचा प्रवेश पुढे ढकलण्यात आल्याची माहिती.भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी माजी आमदार दिलीप माने यांच्या प्रवेशाला विरोध केला होता.मात्र भाजपने याबाबत तोडगा काढून माजी आमदार दिलीप माने यांचा पक्षप्रवेश निश्चित केला आहे.मात्र 29 तारखेला त्यांचा प्रवेश होणार नसून तो पुढच्या टप्प्यात होणार असल्याची सूत्रांची माहिती.दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबई येथे 3 माजी आमदारांचा होणार पक्षप्रवेश होणार

संबंधित व्हिडीओ