सोलापूरमध्ये सीना नदीच्या वाढत्या पाण्यामुळे लव्हे गावावर पुन्हा एकदा पुराचे संकट आहे. मात्र, पाणी ओसरल्यानंतर घरे चोरट्यांच्या निशाण्यावर आली आहेत. घरात जमा झालेल्या गाळात विषारी साप फिरत असल्याने गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन वावरावे लागत आहे.