सोलापूरच्या मंगळवेढ्यातील एका तरुणाची लग्नानंतर फसवणूक झाल्याची घटना पुढे आली आहे.लातूरजवळील उदगीर येथील एका सुरेखा सूर्यवंशी या एजंटने दोन लाख 70 हजार रुपये घेऊन मंगळवेढ्याच्या तरुणाचे लग्न लावले.लग्न लावण्यापूर्वी नववधू असणारी मुलगी मराठा समाजाची आहे असेही सांगितले. लग्न झाले. मात्र लग्न झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात या मुलीने पळून जाण्याचा प्रयत्न केला.