लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी यंदा विशेष नियोजन करण्यात आलं आहे. गेल्यावर्षी विसर्जनावेळी झालेल्या अडचणी लक्षात घेऊन कोळी बांधवांनी नवीन तराफ्याची व्यवस्था केली आहे. समुद्रातील भरती-ओहोटी आणि पाण्याच्या पातळीचा अभ्यास करून २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळेत विसर्जन पार पडणार आहे. त्यामुळे गेल्यावर्षीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत लालबागच्या राजाला प्रतीक्षा करावी लागणार नाही, असा दावा विसर्जनाची जबाबदारी असलेल्या कोळी बांधवांनी केला आहे.. तसेच विसर्जनाचा मान न दिल्याच्या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे.