दर बारा वर्षांनी कुंभमेळा येत असतो, त्यानिमित्ताने हजारो कोटींची कामं नाशिकमध्ये केली जातात. यंदाही तब्बल २५ हजार कोटी रुपयांची विकासकामं नाशकात केली जातायत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन केलं जातंय. मर्जीतल्या कंत्राटदारांना काम देण्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतानाच आता एक धक्कादायक बाब पुढे आलीय. भोंदूबाबा अशोक खरातच्या मालकीची जमिनही नाशिक -त्र्यंबकेश्वर रिंगरोड प्रकल्पात जाणार असून त्या बदल्यात त्याला कोट्यवधींचा सरकारी मलिदा मिळणार आहे..पाहूयात खरंच अशोक खरातला हा कुंभ लाभणार का?