कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर इथल्या संत बाळूमामा देवस्थानातला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आलाय. त्यानंतर गुन्हा दाखल होऊनही हा भ्रष्टाचार काही थांबलेला नाही. बाळूमामांच्या ज्या मेंढ्यांवर भाविकांची अपार श्रद्धा आहे.. त्याच मेंढ्या विकून मंदिराच्या कारभाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार सुरू केलाय. न्यायालयाचा आदेशानंतरही नियम डावलून हा प्रकार सुरूच असल्याने देवस्थानातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे .. पाहूयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट..