दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून नांदेड जिल्ह्यातील माळेगावची यात्रा प्रसिद्ध आहे आणि या यात्रा जनावरांच्या बाजारांसाठी खास ओळखल्या जातात. महाराष्ट्रातील एकमेव उंट खरेदी विक्री बाजार याच यात्रेत असतो. यंदाही यात्रेत उंटांचा बाजार लागलाय पण उंटांच्या किमती मात्र घसरल्यात.