काँग्रेस नेत्या सोनिया गांधीच्या पुस्तकातल्या मजकुरावरून महाराष्ट्रात राजकीय रण पेटलंय. या पुस्तकात सावरकरांबाबत अवमानकारक मजकूर असल्याचा आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेने या पुस्तकाला विरोध करत ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.. तर दुसरीकडे सोनिया गांधींच्या पुस्तकाला विरोध करताना, अतिउत्साहात शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसींकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडला गेल्याने शिंदेंच्या शिवसेनेचीही अडचण झालीय. पाहूयात त्याचबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट.