एव्हाना तो यायला हवा होता... अर्धा जून महिना उलटला तरी त्याची साधी चाहूलही लागलेली नाही. आम्ही बोलतोय ते मोसमी पावसाबद्दल... दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून राज्यात स्थिरावतो. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली असली तरी पाऊस राज्यात रत्नागिरीमध्येच अडकला आहे. मात्र आता त्याच्या आगमनाची नवी तारीख जाहीर झाली आहे. भारतीय हवामान विभागानं नेमका काय अंदाज वर्तवलाय पाहूया.