#BeautyPageant #Uttarakhand #MuskanSharma उत्तराखंडमध्ये सौंदर्यस्पर्धेच्या तयारीदरम्यान स्वतःला संस्कृतीरक्षक म्हणवणाऱ्या काही लोकांनी आक्षेप घेत स्पर्धा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पर्धेत सहभागी झालेल्या एका मॉडेल्सने त्यांना थेट आव्हान दिले आणि टोकदार प्रश्न विचारून त्यांची बोलती बंद केली. 'संस्कृतीरक्षकां'ना भिडून जिंकलेल्या या 'वाघिणी'ची कहाणी आणि हा सगळा वाद नेमका काय आहे, पाहा सविस्तर वृत्त.