गेल्या चार वर्षांत जे घडलं नव्हतं ते अखेर घडलंय. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात तब्बल 25 बेसिस पॉईंट्सची वाढ केलीय.. म्हणजे आता रेपो रेट 5.25 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर गेलाय. RBI ला एवढा कठोर निर्णय घेण्याची वेळ का आली.... आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तुमचा कर्जाचा हप्ता नेमका किती रुपयांनी महागणार आहे... वर्षभरात तुम्हाला किती जास्त पैसे द्यावे लागणार आहेत... पाहुया त्यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट