पुढचे पाच दिवस जरा जपून राहा.... हे सांगायचं कारण म्हणजे पुढचे पाच दिवस राज्यात उष्णतेची लाट असणार आहे... महाराष्ट्रातल्या जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये पारा आताच चाळीशी पार गेलाय... पुढच्या तीन चार दिवसांत हा पारा तब्बल ४५ अंशांपर्यंत जाण्याचा धोका आहे. कुठल्या जिल्ह्यांमध्ये पारा पंचेचाळीशीपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि तुम्ही जर ऐन उन्हाच्या वेळेत ऑफिसला जाणार असाल तर काय काळजी घ्यायला हवी, पाहुया यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...